पंढरपुरातील यमाई तलाव येथे ओपन जीम व व्यायाम शाळेला मिळणार दीड कोटी रूपयांचा क्रिडा निधी

0
युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश ---श्रीकांत शिंदे

पंढरपूर (प्रतिनिधी) -  शहरातील यमाई तलाव (यशवंतराव चव्हाण जलाशय) येथे ओपन जीम निर्माण करण्यात यावी याबाबत या ठिकाणी येणाऱ्या नागरिक, महिला व पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या युवकांकडून मागणी केली जात होती. याचे गांभीर्य ओळखून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी यमाई तलाव येथे ओपन जीव तसेच दोन व्यायामशाळा सध्या कार्यरत असून त्या दोन्ही व्यायामशाळेमध्ये १०० ते १५० पैलवान सराव करीत आहेत. त्यांच्या व्यायामशाळेसाठी हॉल बांधकाम व ७० बाय ७० मॅटची आवश्यकता आहे. त्यासाठी क्रिडा खात्यातुन दोन इमारतींच्या बांधकामासाठी व यासाठी लक्ष्मणदास व्यायाम शाळा, वाखरी, ता. पंढरपूर हॉल व मॅट  रू.५० लाख,  शंभू आखाडा कुस्ती केंद्र हॉल व मॅट रूपये ५० लाख व यमाई तलाव (यशवंतराव चव्हाण तलाव) येथे ओपन जीम निर्माण करण्यासाठी रूपये ५०लाख अशा एकूण १कोटी ५०लाख रूपयांचा निधी देण्याबाबत राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे त्यांना भेटून मागणी केली.
         यावर सदरच्या विषयाचे महत्व सांगितल्यानंतर क्रिडा व युवक कल्याणमंत्री ना.बनसोडे यांनी तात्काळ या पत्रावर शेरा मारत सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना सदरच्या विकास कामासांठी वरीलप्रमाणे निधी मंजूर करावा असे आदेश दिले असल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली. यावेळी माळशिरस तालुक्यातील युवा नेते अक्षय भांड हे उपस्थित होते.

         श्रीकांत शिंदे म्हणाले की, ना.संजय बनसोडे हे नेहमीच विकास कामांसाठी तत्पर असतात चांगल्या कामाला त्यांचे नेहमीच सहकार्य असते बनसोडे साहेबांनी सांगितले की पंढरपूरच्या वैभवात भर पडणार असेल तर निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. पुढे शिंदे म्हणाले की, पंढरपूर शहरातील यमाई तलाव म्हणजेच यशवंतराव चव्हाण तलाव हा पंढरपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारा असून शेकडो जेष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती सकाळी व संध्याकाळ फिरण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी येत असतात. विशेषत: या ठिकाणी पोलीस भरती व इतर भरतीसाठी अनेक युवक दररोज नित्य नियमाने सराव करीत आहेत त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी ओपन जिम उपलब्ध करून दिल्यास त्याचा पंढरपुरातील नागरिकांना व भरतीचा सराव करणाऱ्या युवकांना फायदा होईल. यासाठी मी मंत्री ना. बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली त्यावर त्यांनी तात्काळ शेरा मारत सदरच्या विषयावर शिक्कामोर्तब केलेला आहे. या दीड कोटी रूपयांच्या निधीमुळे यमाई तलाव येथे ओपन जीम व पैलवानांच्या  व्यायामशाळेसाठी हॉल, मॅट साठी १ कोटी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर करावा याबाबत मंत्री ना.संजय बनसोडे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना आदेश दिले असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे यमाई तलाव परिसरात होणार ओपन जीम

            यमाई तलाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपूर्वी ओपन जीम असावी अशी नागरिकांसह युवकांकडून मागणी केली जात आहे. त्यावर गांभीर्याने लक्ष देत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी हा विषय तात्काळ मार्गी लागावा यासाठी ना.संजय बनसोडे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले व त्यांनी जिल्हाधिकारी यांना तात्काळ आदेश दिल्यामुळे यमाई तलाव येथील ओपन जीमचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)