पुणे भाजप शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. धीरज घाटे यांचा मध्यवर्ती मंडळातर्फे सन्मान

0
     पुणे (प्रतिनिधी) - शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन महाराष्ट्रीय  ब्राह्मण मध्यवर्ती  संस्था पुणे व याज्ञवलक्य उद्योजक विकास अभियान तर्फ दि. 3 ऑगस्ट रोजी श्री. धीरज घाटे यांचे पुणे भाजप शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेमध्ये सत्कार करण्यात आला. संस्थेतर्फे कार्याध्यक्ष श्री. विश्राम कुलकर्णी व कार्यवाह श्रीकांत जोशी यांच्या हस्ते श्री. धीरज घाटे यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. धीरज घाटे यांनी संस्थेच्या सर्व  उपक्रमांचे कौतुक केले व संस्थेच्या वसतिगृहाचे नूतनीकरण करण्यासाठी भरघोस मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच कै चंद्रकांत जोशी कार्याध्यक्ष असताना  संस्थेत येऊन गेल्याची आठवण सुद्धा  श्री धीरज घाटे यांनी सांगितली.

      यावेळी युवाचे संस्थापक सदस्य अजय कुलकर्णी, मंजुषा वैद्य, मिलिंद दारव्हेकर, अंजली दारव्हेकर,  मंदार महाजन, आशिष कुलकर्णी, डॉक्टर स्वाती कुलकर्णी, कीर्तनकार सौ. किरण कुलकर्णी हे उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)