वे. मू. विद्याधर रा. वांगीकर यांना "वेदश्री पुरस्कार" प्रदान

0
 

     श्रीक्षेत्र औंध जि. सातारा (प्रतिनिधी) - वेद सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीने वेदमूर्ती श्री. विद्याधर रामचंद्र वांगीकर यांना महाकालीभक्त प.पू. श्री. कालीचरण महाराज, प.पू.मन्ना महाराज, प.पू. अनंतविद्याविभूषण चंद्रतनय दादा महाराज यांच्या शुभ हस्ते "वेदश्री पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम संस्थेच्या वतीने आयोजित अधिक मास निमित्त आयुतचंडी महायज्ञ पूर्णाहुतीचे वेळी संपन्न झाला.
       यावेळी संत महंत विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, संस्थेचे अध्यक्ष व या कार्यक्रमाचे आयोजक वेदमूर्ती श्री. चित्तरंजन बाळासाहेब खटावकर आणि या महायज्ञाचे प्रधानाचार्य घनपाठी श्री. मधुर शास्त्री जोशी, त्रंबकेश्र्वर आदी उपस्थित होते.
         वेदमूर्ती विद्याधर वांगीकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)