पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहर पोलिसांनी मोठी कामगीरी करत गुप्त माहितीदाराच्या मदतीने दुचाकी चोरी करून त्याची विक्री करणाऱ्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भुरट्या चोरास गजाआड केलं आहे, चोरीच्या पंधरा मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत,
पंढरपूर शहर परिसरातून गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, चोरीच्या वाढत्या घटना पाहता दुचाकी चोरी करणाऱ्या मोठ्या टोळीचा पंढरपूर परिसरात वावर असल्याचा अनुभव शहर परिसरातील नागरिकांना होत होता.पण पोलिसांना गुंगारा देत हे दुचाकी चोर राजरोसपणे दुचाकी चोरून त्याची विक्री करत होते. अखेर शहर पोलिसांच्या पथकाने बारकाईने तपास करून दुचाकी चोरीस जाणाऱ्या परिसराची पाहणी करून सूक्ष्म निरीक्षण करत गुप्त माहितीच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेत त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्या कडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने एकूण पंधरा दुचाक्या चोरल्याचा गुन्हा कबूल केला, चोरी केलेली दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने पंढरपूर मध्ये फिरत असताना पोलिसांनी संशयित व्यक्तीस ताब्यात घेतल्या नंतर हा प्रकार उजेडात आला , सध्या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 379 नुसार गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे,
पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे, हे गुन्हेप्रकरण उजेडात आणण्यासाठी पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, राजेश गोसावी, नागनाथ कदम, शरद कदम, सुरज हेंबाडे, बिपिनचंद्र ढेरे, प्रसाद औटी, शोएब पठाण, सचिन इंगळे, सुनील बनसोडे, राकेश लोहार, शहाजी मंडले, समाधान माने आदी पोलीस कर्मचारी वर्गाने कुशलता पूर्वक तपास करून हे मोठं दुचाकी चोरी करणारे रैकेट गजाआड केलं आहे.