पंढरपूर (प्रतिनिधी) -- महसूल सप्ताह उपक्रम अंतर्गत महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या उत्तम आरोग्यासाठी विविध तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते अशी माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी सांगितले.
पंढरपूर येथे तहसील कार्यालयात दि.१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत, सेवा सप्ताह आयोजनेचे करण्यात आले होते.
रविवार दि ६ ऑगस्ट रोजी महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
पुढे बोलताना ते म्हणाले कि वसुली विभागातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी उप जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स कडून विविध आरोग्य तपासणी करण्यात आली.
तसेच त्यांच्या सेवा विषयक विविध समस्या सोडवून रजिस्टर अपडेट करण्यात आले. महसूल दीन सेवा सप्ताहात निमित्त तृतीयपंथीय, वंचित घटक, पारधी समाज,सैनिक, आपत्तीग्रस्त शेतकरी यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्यात आले आहेत.