काँग्रेसच्या वतीने रोपळेत सत्कार समारंभाचे आयोजन

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे शनिवार दि.१२ रोजी सकाळी दहा वाजता विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक व  काँग्रेसच्या माथाडी कामगार विभागाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अशोक पाटोळे यांनी दिली.
        या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हे असणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी  माजी गृहमंत्री रमेश बागवे, माजी आमदार रामहरी रूपनवर, सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्ष निरीक्षक विजय हत्तुरे,  सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर कदम, ओबीसी विभागाचे सुधीर लांडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, पंढरपूर शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी, पंढरपूर तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, महाराष्ट्र प्रवक्ता काका कुलकर्णी, मातंग परीषदेचे ज्ञानदेव खंडागळे ,आण्णसाहेब इनामदार, शेतकरी सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, राजु मस्के, आम आदमी पार्टीचे एम.पाटील, आदिवसी समाज अध्यक्ष पप्पु काळे ,  मातंग एकता आंदोलनचे सुरेश मस्के, प्रकाश साठे, बाजीराव कांबळे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
          या कार्यक्रमाप्रसंगी गट विकास अधिकारी प्रशांत काळे , सिनेअभिनेता पुष्कर लोणारकर, शाहीर नंदकुमार पाटोळे, कलावंत कोमलताई पाटोळे, सरपंच शशिकला चव्हाण, उपसरपंच हनुमंत कदम, सरपंच नागनाथ देवकते, शिवाजी पवार, जगन्नाथ जाधव, दिलीप कोरके, विनोद पाटोळे , उमेश खंदारे, अंबादास वायदंडे, अनिल पाटोळे, तलाठी दादासाहेब पाटोळे, आण्णा पोकळे, पांडुरंग खिलारे, लहुजी सेनेचे मुकूंद घाडगे, बहुजन ब्रिगेडचे राहूल शिंदे, देवीदस कसबे, जयसिंग मस्के, नंदकुमार चव्हाण, नितीन गायकवाड, नामदेव साळुंखे  यांच्यासह डॉक्टर  व पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी व रोपळे येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव, सत्कार समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. तरी या कार्यक्रमासाठी  उपस्थित रहावे असे आवाहन  आयोजक व काँग्रेसच्या माथाडी कामगार विभागाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अशोक पाटोळे यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)