पंढरपूर (प्रतिनिधी) - दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी खासदार सुप्रिया सुळे हे पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर आल्या असता यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, अभिजीत पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सहकुटुंबाने सुळे यांचे स्वागत केले.
पत्रकार परिषदमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या हे टिबल इंजिनचे सरकार असे आहे म्हणतात दिल्लीत देखील त्यांचे सरकार आहे. एखादी सत्ता असताना देखील शेतकरी शेतमजूर, नोकरी दाराचे प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार हे कधी बोलत नाही.मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर हे सरकार बोलत नाही अशी टिका केली.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नेतृत्वाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अभिजीत पाटील हे माझे भाऊ आहेत. त्यांना मी रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली आणि मी त्यांच्या पाठीशी कायम आहे...परंतु मायबाप जनतेने २०२४ला त्यांना आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी असे प्रतिपद उत्तर खा.सुळे यांनी दिले.
पंढरपूर येथील श्री गणेश मोहन जाधव यांनी गेली पाच दिवस पंढरपूर तहसील कार्यालयाजवळ मराठा आमरण उपोषण सुरू ठेवले आहे त्यास अभिजीत पाटील यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर पाठिंबा देऊन आरोग्याची विचारपूस केली.
मंगळवेढा येथील गेल्या काही दिवसांमध्ये नामांकित असलेला खटावकर मॉलला भीषण आग लागल्याने पूर्ण मॉल जळून खाक झाला त्यास सुप्रिया सुळे व चेअरमन अभिजीत पाटील यांनी भेट देऊन सांत्वन केले..