एक धाडसी प्रशासक हरपला..
पंढरपूर (प्रतिनिधी) - उपजिल्हाधिकारी डॉ. विजयकुमार देशमुख हे अभ्यासू वृत्ती, धाडसी निर्णय, उत्तम प्रशासक, ओतप्रत आत्मीयता, प्रेमळ व मृदू स्वभाव, निष्ठावंत अशा विविध गुणांनी त्यांनी आपली प्रशासकीय क्षेत्रात ओळख निर्माण केली होती.
कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर या पदावर कार्यरत असताना, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासाचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न, सेवाधारी ओवरीचे नूतनीकरण, बुंदी लाडू प्रसादाची आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी, प्रदक्षिणामार्ग व चंद्रभागा नदीपात्र मंदिर समितीमार्फत साफसफाई करणे, कर्मचारी सेवा विनियम 2015 व इतर अनुषंगिक असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
प्रशासकीय क्षेत्रातील अनेक पदे त्यांना मिळाली. त्या प्रत्येक पदाची उंची वाढवण्याचे काम सरांनी केले. नवे घडवण्याची जिद्द, कल्पकता आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
आज त्यांच्या जाण्याने एक धाडसी निर्णय घेणारा उत्तम प्रशासक हरपला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व त्यांच्या कुटुंबांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो ही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना....