कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची पंढरपूर शहरातून ढोल ताशाच्या निनादात भव्य मिरवणूक
पंढरपूर (प्रतिनिधी)– ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे छत्तीसाव्या जयंतीनिमित्त येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक पंढरपूर
शहरातून फुलांनी सजवलेल्या रथातून ढोल ताशाच्या निनादात काढण्यात आली.
या मिरवणूकीच्या सुरुवातीस रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अमरजीत पाटील, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, चेअरमन अभिजित पाटील, बाळासाहेब नेहतराव, सुभाष भोसले, डॉ. दादासाहेब साळुंखे, अप्पासाहेब पाटील, डॉ. राजेंद्र जाधव, जगन्नाथ भायगुडे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य राजेंद्र कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, मुख्याध्यापक सौ. अनिता साळवे व पर्यवेक्षक युवराज आवताडे आदी मान्यवरांनी महाविद्यालयातील कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.’
या मिरवणूकीस महाविद्यालयातून प्रारंभ होवून पुढे ही मिरवणूक कर्मवीर पथ, सरगम चौक, इंदिरा गांधी चौक, नवी पेठ, अर्बन बँक, भादुले चौक, नगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावरकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ग्रामीण पोलीस स्टेशन, मार्केट यार्ड या मार्गाने
महाविद्यालयात आली. या मिरवणूकीत विद्यार्थिनीचे झांज पथक, टिपरी नृत्य
पथक आणि छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान भेटीचा जिवंत देखावा हे खास आकर्षण ठरले. या मिरवणुकीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचार आणि कार्याच्या विषयी माहिती देणारे फलक विद्यार्थ्यांनी घेतले होते. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या घोषणा सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी दिल्या. यावेळी प्रा. डॉ. अमर कांबळे, प्रा. सुमन
केंद्रे, प्रा. डॉ. भारती सुडके, प्रा. कुबेर गायकवाड यांनी निवेदन केले.
या मिरवणुकीत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, कमवा व शिका योजना, सिनिअर, ज्युनिअर, व्यवसाय अभ्यासक्रम विभाग आदी विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने सहभागी झाले होते.
या मिरवणुकी वेळी पंढरपूर शहरातील रयत शिक्षण संस्था प्रेमी
नागरिक, माजी विद्यार्थी, राजकीय नेते आणि व्यापारी यांनी कर्मवीरांच्या
प्रतिमेस अभिवादन केले. ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग
प्रमुख डॉ. रमेश शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय चौधरी, राष्ट्रीय छात्र सेना लेफ्टनंट प्रा. डॉ. समाधान माने, प्रा. डॉ. सुशीलकुमार शिंदे, प्रसिद्धी प्रमुख डॉ. दत्ता डांगे, प्रा. दत्ता खिलारे, कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी, अभिजित जाधव, सुरेश मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले.