समाजसेवक मुजम्मील कमलीवाले शांतता पुरस्काराने सन्मानित

0
           पंढरपूर (प्रतिनिधी) - जॉईन फॉर पीस ही संस्था समाजात सामाजिक सलोखा निर्माण होवून शांतता व बंधूभाव निर्माण होण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे, याचाच एक भाग म्हणून २१ सप्टेंबर जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून समता बंधूता या तत्वांना प्रमाणित मानून मानवता, सामाजीक ऐक्य, शांतता व राष्ट्रीय एकत्मता जोपासण्याचे काम करण्यार्या व्यक्तींना मागील चार वर्षापासून जेपी शांतता पुरस्काराने सन्मानित करते.
          यावर्षीच्या जे.पी. २०२३ पुरस्काराचे मानकरी पंढरपूर येथील समाजसेवक मुज्जमील कमलीवाले यांना देण्यात आले. सोलापुर येथे अचिव्हर्स मल्टीपर्पज हाॅल मध्ये माजी आमदार काॅ. नरसय्या आडम यांच्या हस्ते या मुज्जमील कमलीवाले यांना सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुजम्मील कमलीवाले हे त्यांच्या कुटुंबासह उपस्थित होते.
            पंढरपूर मधील समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य निस्वार्थी पणाने करीत आहेत. समाजातील गरीब, वंचित, दिन दुबळ्या तसेच आधार हिन व्यक्ती यांना तन मन धन स्वरूपात जमेल तशी मदत करत आपले सामाजिक कार्य ते करत असताना त्यांनी अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे .अशा विविध प्रकारे  चांगल्या कामाची कामगिरी पाहून त्यांना हा मानाचा सामाजिक जे.पी.२०२३ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
वयाच्या अवघ्या २१ वर्षापासून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. विशेष म्हणजे ते मेडीकल व्यवसाय करतात ते बघत सामाजिक कार्यसाठी वेळ काढून त्यांचे समाज कार्य चालुच आहे. परिस्थितीवर मात करुन संघर्ष करुन आज ते सर्वसामान्य जनतेसाठी झटत आहेत. शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द त्यांची अंगी आहे.
             यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. जैनुद्दीन पटेल, सचिव प्रा.डाॅ.जैनोद्दीन मुल्ला, उपाध्यक्ष प्रा. इरफान लालकोट, ॲड.आसीफ शेख व जावेद मुजावर, सहसचिव अल्लाबक्ष सय्यद खाॅ, खजिनदार म. शफिक रचभरे सदस्य म.सलिम शिकलगर यांच्यासह सोसायटीचे सभासद आणि नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)