श्री. शनी महाराज घुलेंनी केले टँकरने पाण्याचे वाटप

0
पंढरीत पाणीटंचाईमुळे प्रभाग सोळा सह विविध भागात श्री. शनि महाराज घुले यांचेकडून मोफत पाणी वाटप

           पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहराला सध्या एक दिवसा आड तसेच अनियमित पाणीपुरवठा सुरू असल्याने शहराच्या विविध भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याचे पाहून संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शनी महाराज घुले यांनी स्वखर्चाने प्रभाग क्रमांक 16 सह शहराच्या विविध भागात तसेच लक्ष्मी नगर येथे मोफत पाण्याचे टँकरने पाणीपुरवठा सुरू करुन नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. 
        पावसाने ओढ दिल्याने चंद्रभागेचे पात्र कोरडे पडले आहे. उजनीतून सोडलेले पाणी आज चंद्रभागेत दाखल होणार असून शहराला दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता पाणी असूनही एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
          सद्यस्थितीमध्ये शहराच्या विविध भागात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने लोकांना पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे. त्या त्या भागातील नगरसेवक ही पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नसल्याचे पाहून  शहराध्यक्ष मात्र गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून आले त्यांनी कोणताही विचार न करता स्वखर्चाने शहराच्या विविध भागासह प्रभाग क्रमांक 16 आणि लक्ष्मी नगर मध्ये पाण्याचे टँकर सुरू करून घराघरात आपल्या कार्यकर्त्याद्वारे पाणी पोहोच केले त्यांच्या या कार्याची दखल घेत नागरिकांत तसेच महिला वर्गातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
          ज्या प्रशासनाला आम्ही टॅक्स भरतो ते प्रशासन आमच्या कोणत्याही मूलभूत गरजा भागवू शकत नसताना आज सर्वसामान्य जनतेतील युवक उभा राहून पुढे येतो आणि मदतीचा एक हात देतो हे पाहून आम्हाला साक्षात पंढरीतील पांडुरंग विठ्ठल धावून आल्याचे जाणवत आहे. अशी प्रतिक्रिया आता नागरिकांतून व्यक्त होऊ लागली आहे. यावेळी सर्व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)