तिसंगी तलावात ४ सप्टेंबर पासून पाणी सोडण्याचे आदेश पारित

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा पावसाने अपेक्षेप्रमाणे हजेरी न लावल्याने आमदार श्री.समाधानदादा आवताडे साहेब यांनी पुणे येथील जलसंपदा विभागाच्या बैठकीमध्ये तिसंगी तलावामध्ये पाणी सोडण्याची मागणी केली असता संबंधित विभागाकडून ४ सप्टेंबर पासून सोडण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

हे पाणी सुटल्यानंतर मतदारसंघातील रांझणी,अनवली,एकलासपूर, कासेगाव,तावशी,तनाळी,खर्डी, शेटफळ,उंबरगाव,बोहाळी या गावांना पाणीप्रश्नाच्या अनुषंगाने मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे येथे राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील साहेब, महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. राधाकृष्ण विखे-पाटील साहेब व सहकारमंत्री ना.श्री. दिलीप वळसे-पाटील साहेब व इतर राजकीय कार्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि संबधीत प्रशासकीय अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.

सदर भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उंबरगाव येथील श्री.विजय ज्ञानेश्वर पवार यांनी भाडगर कॅनॉल मध्ये पाणी सोडण्याकरीता सोनके येथे आंदोलन केले होते. आपल्या या मागणीची पाणी प्रशासन दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गेल्या तीन तासांपासून सोनके येथील टॉवर वर आपला आंदोलन ठिय्या मांडला असल्याचे आमदार महोदय यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

पाणी व्यवस्थापनातील नियोजन अभाव व अपुरे कर्मचारी-अधिकारी यामुळे हे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास विलंब होत असल्याबद्दल आमदार महोदय यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून सुद्धा केवळ योग्य व्यवस्थेमध्ये समन्वय नसल्यामुळे हे पाणी आले नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

या बैठकीसाठी माजी सहकार मंत्री श्री.हर्षवर्धन पाटील साहेब, आ.श्री.शहाजीबापू पाटील साहेब,आ.श्री.राहुलदादा कुल साहेब यांचेसह इतर मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)