शासनाच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांनी प्रयत्न करणे गरजेचे - रोहन परिचारक

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) -  सोलापूर जिल्ह्याचे मा. आमदार प्रशांतराव परिचारक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पंढरपूर तालुका पंचायत राज व ग्राम विकास विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार महामंडळ नाव नोंदणी सेवा पंधरवाडा शिबिराच्या आयोजनानिमित्त शेवते येथील कार्यक्रमात युटोपियन  शुगरचे एमडी  रोहनजी परिचारक साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गावातील प्रत्येक युवकांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारचे माध्यमातून ज्या काही कल्याणकारी योजना आहेत या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी गावातील प्रत्येक युवकांनी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन केले.
         तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेची प्रतिमा व श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक  यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक मालक यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये शेतकरी शेतमजूर कामगार हा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून नेहमीच विकासाचे काम करुन या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केलेले आहे व श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक मालक  यांचाच वसा घेऊन आदरणीय प्रशांतरावजी परिचारक सर्वसामान्यांसाठी काम करीत आहेत  व त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो स्तुत्य उपक्रम संपूर्ण तालुक्यामध्ये सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने राबवल्याबद्दल  आयोजक मनोज पवार व भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग व त्यांच्या सर्व टीमचे आदरणीय रोहनजी परिचारक यांनी आभार मानले व गावातील जास्तीत जास्त कामगारांनी आपली नोंदणी करून घ्यावी व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

         हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष कुलकर्णी, बाळासाहेब माळी, सोपान पाटील, महादेव यारनाळे, पांडुरंग धोत्रे, अरुण पाटील, भारत पाटील, बाळासाहेब पाटील, राहुल पाटील, हनुमंत येलपले, शेवते येथील सर्व ग्रामस्थ व भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्राम विकास विभागाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)