विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये आत्मविश्वास वाढविणे गरजेचे - डॉ.संगिता पाटील

0
       पंढरपूर दि. 4 (प्रतिनिधी) -  वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वसंतदादा प्रतिष्ठाण पंढरपूर संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.कल्याणराव वसंतराव काळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्तिमत्व विकास या विषयावरीत मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सौ.जयश्रीताई विलासराव काळे, प्रमुख पाहुणे सौ.डॉ .संगिता पाटील (अध्यक्षा राही फाऊंडेशन पंढरपूर), प्रमुख उपस्थित सौ.डॉ.जयश्रीताई शिनगारे, श्री. चंद्रकांत कुंभार सचिव वसंतदादा प्रतिष्ठाण पंढरपूर, श्री.संतोष गुळवे प्राचार्य वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी हे होते.

          यावेळी बोलताना डॉ. सौ.संगिता पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास वाढविणे गरज आहे. त्याचा बरोबर आपल्या मध्ये असलेली क्षमता ओळखून ध्येय निश्चित करावे. डॉ. सौ.जयश्री शिनगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक श्री. संतोष गुळवे यांनी केले. आभार अक्षय कुचेकर यांनी मानले. सुञसंचालन श्री.अनिल ननवरे यांनी केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक व जनकल्याण नर्सिंग कॉलेजचे शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)