अकलूज ता.माळशिरस (प्रतिनिधी) - सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघटना (सुटा) पंढरपूर विभाग अध्यक्ष म्हणून प्रा. श्री.अनंत कुलकर्णी उमा महाविद्यालय पंढरपूर जि.सोलापूर यांची रविवार दिनांक 3/9/2023 रोजी श्री.शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय अकलूज ता.माळशिरस येथे आयोजित संघटना बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. पुढील दोन वर्षांसाठी कामास शुभेच्छा देण्यात आल्या. प्रा.डॉ. बाळासाहेब मुळिक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रा.डॉ. हणमंत आवताडे व उपस्थित महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.
पंढरपूर विभाग अध्यक्ष म्हणून प्रा.श्री.अनंत कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.