कायद्याच्या जनजागृतीसाठी महत्वाचा घटक म्हणजे विधीस्वयंसेवक - न्यायाधीश श्री. महेश लंबे

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) – गावामध्ये, महाविद्यालयामध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी कायद्याचा प्रसार होणेसाठी कायदेविषयक शिबीराचे आयोजन केले जाते त्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयामार्फत विधी सेवा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे, या समितीमध्ये न्यायाधीश, विधीज्ञ तसेच विधीस्वयंसेवक यांची नेमणुक करण्यात येते. यामध्ये कायद्याचा प्रसार करणेसाठी विधीस्वयंसेवक हा महत्वाचा घटक असलेबाबतचे गौरोउद्गार दिनांक १ सप्टेंबर, २०२३ रोजी आयोजित केलेल्या बैठकीवेळेस विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मा. श्री. महेश लंबे यांनी केले. 
          जर महिन्यामध्ये कायद्याचा प्रसार करणेसाठी खेडोपाडी, चावडीवर, शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी कायदेविषयक शिबीराचे आयोजन करुन कायद्येविषयक मार्गदर्शन केले जाते. सदर शिबीराचे पुर्वनियोजन करणेसाठी जर महिन्याच्या १ तारखेला अधिवक्ता संघाचे पदाधिकारी, सर्व न्यायिक अधिकारी तसेच समितीवरील विधीस्वयंसेवक यांच्या बैठकीचे आयोजन केले जाते व त्या बैठकीमधुन शिबीराची दिनांक, शिबीराचे ठिकाण इत्यादी गोष्टींवर चर्चा केली जाते. सप्टेंबर महिन्यामध्ये शिबीराच्या पुर्वनियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. 
          सदर बैठकीस न्यायाधीश श्री. एम. बी. लंबे, श्री. बी. बी. तोष्णीवाल, श्रीमती एस. एस. पाखले, श्री. ए. ए. खंडाळे, श्री. एन. एस. बुद्रुक, श्री. एम. आर. कामत, श्री. पी. पी. बागुल, श्री. ए. एस. सोनवलकर, श्रीमती पी. एन. पठाडे, श्रीमती एस. ए. साळुंखे, तसेच पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष श्री. अर्जुन पाटील, उपाध्यक्ष श्री. शशिकांत घाडगे, सचिव राहुल बोडके, विधीस्वयंसेवक श्री. सुनिल यारगट्टीकर, श्री. नंदकुमार देशपांडे, श्री. पांडुरंग अल्लापूरकर, श्री. अंकुश वाघमोडे, श्री शंकर ऐतवाडकर तसेच विधीज्ञ उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)