पुस्तिकेत विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करणाऱ्या स्तोत्रांचे संपादन
श्रीक्षेत्र पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील श्री अमळनेरकर महाराज मठात प. पू. प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते प्रा. डॉ. प्रभाकर जोशी अमळनेर संपादित बालसंस्कार स्तोत्रमाला या पुस्तिकेचे प्रकाशन आज रोजी करण्यात आले. त्यावेळी कौंडिण्य गुरुजी व सौ. गौरीताई जोशी उपस्थित होत्या.
आज नित्याचे भजनाची सांगता झाल्यावर परमपूज्य प्रसाद महाराजांनी या पुस्तिकेचे प्रकाशन केले. उपस्थितांनी पुस्तकेला छान प्रतिसाद दिला. हे पुस्तक पुणे येथील त्रिमूर्ती प्रकाशन आप्पा बळवंत चौक यांनी केले आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करणाऱ्या स्तोत्रांचे संपादन या पुस्तिकेत आहे .
या पुस्तिकेची किंमत रुपये तीस आहे. पुस्तिका मिळवण्यासाठी मो. 94 23 93 49 57 व 9922249599 वर संपर्क साधावा.