भाळवणी ता. पंढरपूर (दि.05) :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त वसंतदादा मेडिकल फौंडेशन संचलित जनकल्याण हॉस्पीटल व सहकार शिरोमणी कारखाना यांच्या संयुक्त् विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सहकार शिरोमणी कारखान्यातील सर्व कर्मचारी व त्यांचे कुंटुंबियांचे ॲपेंडीस, हार्नेया, गर्भाशयातील पिशवी काढणे इ. ऑपरेशन व औषधोपचार सप्टेंबर, 2023 अखेर विनामुल्य् करण्यात येणार असल्याचे जनकल्याण हॉस्पीटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधिर शिनगारे यांनी यावेळी सांगितले. कारखान्याचे संस्थापक वसंतदादा काळे यांच्या आशिर्वादाने त्यांचा वारसाआम्ही पुढे चालु ठेवला असून, चेअरमन कल्याणराव काळे यांचे मार्गदर्शनाखाली जनकल्याण हॉस्पीटलच्या माध्यमातुन विविध समाजिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांची व हॉस्पीटलच्या वतीने विविध आजारावर करण्यात येत असलेल्या ऑपरेशन व इलाजाची माहिती दिली. तसेच जनकल्याण हॉस्पीटलमध्ये विविध ऑपरेशनकरीता होणारा खर्च व इतर हॉस्पिटलमध्ये येणारा खर्चाची माहिती सांगुन जनकल्याण हॉस्पीटलमध्ये कमी दरामध्ये चांगले उपचार करण्यात येत असून, सर्व कर्मचारी व त्यांचे कटुंबियानी याचा लाभ घ्यावा असेही सांगितले.
सदर सर्वरोग निदान व औषधोपचार शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर यांचेशुभहस्ते करण्यात आले. सुरुवातीस श्रीविठ्ठल व संस्थापक सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते करुन करण्यात आले. शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर् आस्थिरोग तज्ञ डॉ.कुलकर्णी, फिजीशियन सौरभ ठवरे, डॉ.अनिल काळे, डॉ.अमोल आव्हाड, सद्दाम मनेरी, नर्सिंग स्टाफ यांचेकडून तपासणी व सल्ला घेवुन 87 गरजुंनी औषधोपचार घेतले. यावेळी पंचायत समिती माजी सदस्य सुरेश देठे, मोहन नागटिळक यांनी आपले मनोगत व्यक्त् करुन गरजु कामगारांना जनकल्याण हॉस्पीटलमध्ये मोफत करण्यात येत असलेल्या ऑपरेशनचा लाभ घेवुन आर्थिक बचत करण्याचे आवाहन केले.
यावेळी कारखान्याचे संचालक मोहन नागटिळक, आण्णा शिंदे, गोरख जाधव, युवराज दगडे, सुरेश देठे, राजाभाऊ माने, परमेश्वर लामकाने, अमोल माने, कार्यकारी संचालक झुंजार आसबे, डेप्यु.जनरल मॅनेजर के.आर.कदम, डिस्टीलरी मॅनेजर पी.डी.घोगरे, वर्क्स मॅनेजर जी.डी.घाडगे, मुख्य शेती अधिकारी अशोक गुळुमकर, चिफ अकौंटंट बबन सोनवले, सिव्हिल इंजिनिअर एन.एम. काळे, परचेस ऑफिसर सी.जे.कुंभार, केनयार्ड सुपरवायझर दिलीप काळे, बंडु पवार तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थितांचे आभार डिस्टीलरी मॅनेजर पी.डी.घोगरे यांनी मानले.