पंढरपूर उपनगरातील महत्वाचा प्रश्नांची लवकरच होणार सोडवणूक

0
चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मागणीची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल

जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ अहवाल पाठविण्याची सूचना

          पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहरातील उपनगरामध्ये राहणाऱ्या नागरिकाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागील काही दिवसांपुर्वी पत्र दिले होते. त्या पत्राची तात्काळ दखल घेतली आहे. त्याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास याबाबतचा अहवाल तातडीने पाठविण्यास सूचना केल्यामुळे उपनगरातील लोकांचे आर्थिक नुकसान टळणार आहे आहे.

        या उपनगरातील लोकांना अनेक वर्ष शेतसारा कर आणि नगरपालकेतील कर असे दोन्ही कर भरावे लागत होते. त्यामुळे विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत होता. याबाबत चेअरमन अभिजीत पाटील यांच्याकडे उपनगरातील लोकांनी आपले गाऱ्हाणे मांडले होते. त्यानुसार पाटील यांनी १७ जुलै रोजी उपमुख्यमंत्री यांना याबत एक निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात वरील करापैकी फक्त नगरपालिका कर घेण्यात यावा. या भागातील लोकांना नगरपालिका हद्दीतील सिटी सर्व्हे मध्ये समावेश करण्यात यावा. एक घर एक कर घेऊन नागरिकांचा आर्थिक बोजा कमी करावा अशी मागणी केली होती.

        वरील देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र प्राप्त होताच हालचाली सुरू झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने पंढरपूर नगरपालिकेसाठी २१ सप्टेंबर रोजी पत्र पाठविले असून याबाबतची प्रत चेअरमन अभिजीत पाटील यांना देण्यात आली आहे. 

        पंढरपूर व उपनगरातील लोकांच्या समस्या असल्याने तत्काळ पावत्या घेऊन संपर्क करावा असे आवाहन अभिजीत पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वरील पत्रांमधून तात्काळ याबाबतची दखल घेऊन पंढरपूर नगरपालिकेला अहवाल पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या नागरिकांकडून चेअरमन अभिजीत पाटील यांचे विशेष आभार मानले जात आहे...

मतदार संघातील महत्वाचे प्रश्नासाठीच घ्यावी लागते मंत्र्यांची भेट

       विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केवळ साखर कारखानदारी हेच काम पाहत बसले नाहीत. त्यांनी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन पंढरपूर आणि मंगळवेढा भागातील अनेक महत्वाचे प्रश्न मांडले आहेत. यासाठीच त्यांची नेहमी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे भेट असते. त्यामुळे पंढरपूर भागातील महत्वाचे प्रश्न आमदार कडून मांडले जात नसले तरी अभिजीत पाटील यांच्या विकासाची दूरदृष्टी असलेल्या अभिजीत पाटील यांच्याकडून अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागणार असल्याचा पक्का विश्वास पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील जनतेला वाटू लागला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)