सोलापुरात मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा गौरव

0
सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशनचेवतीने "मनसे गौरव"

        सोलापूर (प्रतिनिधी) -  पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांना कोरोनाच्या कालावधीमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात गौरविण्यात आले.

         यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख मंगेश चिवटे, सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे, डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील गावडे, उद्योगपती विनोद महाडिक विजयराज डोंगरे शेतकरी नेते माऊली हळणावर, मनसेचे पंढरपूर शहर उपाध्यक्ष गणेश पिंपळनेरकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)