बावची येथील ओढ्यावरील पुलाला साडेतीन कोटी मंजूर- आ. आवताडे

0
           मंगळवेढा  (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करणे योजनेअंतर्गत नाबार्डकडून मंगळवेढा येथील बावची गावाशेजारी असणाऱ्या ओढ्यावर फुल उभारणीसाठी तीन कोटी पन्नास लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. गाव भेट दौरा सुरू असताना बावची येथील ग्रामस्थांनी ओढ्यावरील पूल अत्यंत गरजेचा आहे. तात्काळ तो पूल मंजूर करा अशी मागणी केली होती. पत्राद्वारे संबंधित विभागाला या रस्त्यावर पूल उभारणे गरजेचे आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी शासनस्तरावर केली होती. त्यानुसार नाबार्ड कडून नुकतीच राज्यातील कामांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये या पुलालाही मंजुरी मिळाली असल्याचे आ. समाधान आवताडे यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ-भाळवणी-निंबोणी-बावची- सलगर हा महामार्ग असून या रस्त्यावर बावची येथे ओढ्यावर पुलाची आवश्यकता होती. मोठ्या पावसात या रस्त्यावर पाणी येत होते त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. त्यामुळे याठिकाणी पूल गरजेचा आहे तरी या ओढ्यावर पूल करा अशी मागणी बावची येथील अशपाक पटेल व ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार मागणी केल्याने सरकारने तात्काळ या पुलाला निधी दिला असून येथील दळणवळणाच्या मार्ग सुकर होणार असल्याचे आ. आवताडे यांनी सांगितले.

आ. समाधान आवताडे यांनी गावभेट दौरा सुरू असताना तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्या पुलाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना आम्हाला दिल्या होत्या त्यानुसार आम्ही सर्व्ह करून अंदाजित आकडेवारी कळविली होती त्यानुसार मंजुरी मिळाली असून हिवाळी अधिवेशनात बुकलेट वर काम येईल त्यानंतर टेंडर प्रक्रिया केली जाईल.
ए. एन. मूलगीर, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम मंगळवेढा

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)