पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाने सामान्य लोकांची अडचण लक्षात घेऊन सणाचा आनंद घेता यावा याकरता अल्प दरात आनंदाचा शिधा सर्व स्वस्त धान्य दुकानातून शंभर रुपयांमध्ये चार वस्तू देण्याची सोय करून दिलासा दिल्याने गौरी गणपती क्षण आनंदाने साजरा करण्याकरता गौरी गणपती सनापूर्वी शिधा देण्याची सोय केल्याने शिधापत्रिका धरकात समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील व ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानातून दरमहा देण्यात येणाऱ्या मोफत गहू तांदूळ याबरोबरच शंभर रुपयांमध्ये साखर तेल रवा व दाळ देऊन सोय केल्याने समाधान व्यक्त होत आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी केले. शहरातील स्वस्त धान्य दुकानापैकी गणेश ग्राहक सहकारी संस्था शाखा क्रमांक एक स्वारगेट कॉर्नर या दुकानातून शिधापत्रिका धारकासाठी आनंदाचा शिधा शिधापत्रिका धारकांना या भागाचे नगरसेवक शैलेश बडवे तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास, तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये, जिल्हा सचिव सुहास निकते, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष व पत्रकार नंदकुमार देशपांडे यांच्या हस्ते व स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष शशिकांत सुगंधी वाटप करण्यात आले.
गौरी गणपती सनापूर्वी आनंदाचा शिधा शहरातील व ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात प्रशासनाने व पुरवठा विभागाने सणापूर्वी चार दिवस अगोदर वाटपास उपलब्ध करून दिल्याने शिधापत्रिका धारकाची सोय झाल्याने शिधापत्रिकाधारकातून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष शशिकांत सुगंधी, आनंद भिंगे व आनंदाचा शिधा नेण्यासाठी शिधापत्रिका धारक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. स्वस्त धान्य दुकानदार विजय कुलकर्णी यांनी येणाऱ्या प्रत्येक शिधापत्रिका धारकास रात्री उशिरापर्यंत आनंदाचा शिधा वाटपाची सोय केली.