गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्ण मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी
पंढरपूर (प्रतिनिधी) - सुमारे दीडशे वर्ष पुरातन अशा पंढरपूर येथील चौफाळा येथे श्रीकृष्ण मंदिरात आज भल्या पहाटे श्रीकृष्ण दुग्धाभिषेक करून श्रीकृष्णाचे मूर्ती सभोवती फुलांची रंगीत आकर्षक आरास करून तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई व मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. भक्तांच्या समवेत भल्या पहाटे पूजा संपन्न झाल्यानंतर भाविकांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. तिसऱ्या पिढीतील सागर बडवे ,पियुष बडवे, पप्पू बडवे हे दरवर्षी कृष्णाष्टमीला मंदिराची स्वच्छता करून गोकुळाष्टमीच्या निमित्ताने विविध फुलांच्या माळांनी मंदिर व श्रीकृष्णा भोवती फुलांची आरास केली जाते अशी माहिती जेष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे यांनी दिली.