संयोजक संजय निंबाळकर, बसवेश्वर देवमारे, सिकंदर बागवान यांच्या कार्याचे रोहन परिचारक यांनी केले कौतुक
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपुर येथील नगरपालिका शिक्षण मंडळ संचालित विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक ६ येथे युटोपियन शुगरचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
मा. आ. प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना रोहन परिचारक म्हणाले की, शालेय जीवनात विद्यार्थ्यांना योग्य व मुल्य शिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. त्यांचा शिक्षक व विद्यार्थी वर्गाला भरपूर फायदा झाला आहे. विद्यार्थी व नगरपालिका शाळा यांच्या अडचणी सोडविण्यासाठी व त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य व इतर मदत असे उपक्रम पांडुरंग परिवार व आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यकर्त्यांकडून नेहमीच केली जाते तसेच अशा विधायक उपक्रम बाबत त्यांनी संयोजक व शिक्षक वर्ग कर्मचारी यांचे आभार मानले.
यावेळी प्रमुख पाहुणे अमोल डोके माजी नगरसेवक बशीर तांबोळी माजी सभापती नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ पंढरपूर, गुरू दोडिया माजी उपसभापती नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ पंढरपूर, कृष्णा वाघमारे, इक्बाल बागवान, यासीन बागवान, उमेश ढोबळे, दत्ता पाटील पत्रकार, जोतिराम पवार, सुखदेव माने, अरुण देवमारे, उमेश सर्वगोड आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.सदर कार्यक्रमांचे संयोजक संजय निंबाळकर नगरसेवक व माजी सभापती नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ पंढरपूर, बसवेश्वर देवमारे नगरसेवक, सिकंदर बागवान मा. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी केले होते.
यासाठी सहभागी शाळा नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक ६, नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक ७, नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक ९, नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक १०, नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक १४, नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक १६ या शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप मान्यवर मंडळी यांच्या हस्ते करण्यात आले करण्यात आले.यावेळी प्रशालेचे शिक्षक, शिक्षका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच केंद्रसमन्वयक रामचंद्र बोडरे, मुख्याध्यापिका शुभांगी शहाणे आदी शिक्षक, शिक्षका उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडीराम तांदळे यांनी व आभार प्रदर्शन रमेश थोरात यांनी केले.