सप्टेंबरमध्ये होणार ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर दोन रहस्यमय कथांचा उलगडा

0
           मुंबई (प्रतिनिधी) :- गूढ, गुपितं, रहस्य आणि या अशा रहस्यांनी तुडुंब भरलेल्या कथा आणि त्यांचा होत जाणारा उलगडा नेहमीच आपल्याला रोमांचकारक अनुभव देत असतो आणि आपण त्यांची अनुभूती घेत असतो. अशाच रहस्यांनी भरलेले 'सिमर' आणि 'लिपस्टिक मर्डर' हे दोन मराठी डब चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहेत.
          इन्स्पेक्टर राज एका सिरीयल किलरच्या केसचा तपास करत आहे. तो अधिक तपास करत असताना, एका मुलीच्या प्रेमात पडतो पण ज्या केसचा तो तपास करत आहे, त्या केसचा मुख्य आरोपी ती मुलगीच निघाली तर? 'लिपस्टिक मर्डर' ची कथा या प्रश्नात पाडते तर  हॉटेलमधल्या एका तरुण आचाऱ्याला त्याच्या कुटुंबासाठी मोठ्या रकमेची गरज असते. तेव्हा त्याचा मालक त्याला मोठी रक्कम मिळवण्याची एक संधी देतो. हॉटेलचे काम झाल्यानंतर एक विशिष्ट पेटी रोज एका विशिष्ट ठिकाणी पोहचवणे, परंतू त्यात एक अट आहे की, ती पेटी चुकूनही उघडायची नाही. पेटी आणि पेटीमधील अदृश्य गुपिताभोवती ‘सिमर’ची कथा फिरते.
     ‘चित्रपट, वेब सिरीज, आणि अन्य कार्यक्रमांतून 'अल्ट्रा झकास’ हा महाराष्ट्रातल्या मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सातत्य ठेवत असून रसिक प्रेक्षकांचा आवडता ओटीटी बनला आहे. ‘अल्ट्रा झकास’वर आजवरच्या दर्जेदार चित्रपटांबरोबरच सप्टेंबर महिन्यात 'लिपस्टिक मर्डर' आणि ‘सिमर’ या दोन दर्जेदार रहस्यमय मराठी डब चित्रपटांचा समावेश करून आम्ही प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालत आहोत. आशा आहे की या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद आणि प्रेम मिळेल" अशी भावना अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात व्यक्त केली.
 
अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. सप्टेंबर मधील झकास हस्यमय कथांचा उलगडा करण्यासाठी लगेच डाउनलोड करा 'अल्ट्रा झकास ओटीटी' ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.
App link:
 https://ultrajhakaas.app.link  
*रहस्यांनी भरलेले 'सिमर' आणि 'लिपस्टिक मर्डर' या मराठी डब चित्रपटांचे प्रोमो पाहण्यासाठी लिंक*
https://www.facebook.com/UltraJhakaas
https://www.instagram.com/ultrajhakaas
https://www.youtube.com/@ultrajhakaas
https://twitter.com/ultrajhakaas

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)