पंढरपूर (प्रतिनिधी) -- स्वेरीज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या युवा महोत्सवाचे मान्यवर मंडळी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन समारंभ संपन्न झाले.
या युवा महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. प्रकाश महानवर, त्याचबरोबर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खा. डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, डॉ. गणेश चंदनशिवे लोककला अकॅडमी, विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठ, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक महाराष्ट्र राज्य मंत्रालय बिभिषणजी चवरे, या सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व नटराज्याच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी खा.जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी पालक व सर्व शिक्षकांना सांगितले की; स्वेरीज कॉलेज यांनी आजपर्यंत मोठमोठे विद्यार्थी घडवले असून ते मोठमोठ्या पदावर आज विराजमान आहेत.संस्थेने खूप मोठे चांगले काम सोलापूर व संपूर्ण महाराष्ट्रात केले असल्याचे त्यांनी यावेळी गौरवोद्गार काढले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की- लोकसभा निवडणुकीबाबत विचारले असता पक्षाने जर पुन्हा मला एकदा उमेदवारी दिली तर मी सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवण्यास तयार आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची व भारत मातेची सेवा करण्यासाठी मी सदैव तयार असल्याचे यावेळी खा.सिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले.
यावेळी खा. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना खा. स्वामी यांनी त्यांनी माझ्याकडे येऊन मी मतदार संघातील किती प्रश्न सोडवले आहेत व संसद भवनात मी किती प्रश्न मांडले आहेत याची माहिती घेऊन जावी.
यावेळी विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ( स्वेरीज ) येथे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांचे सर्व प्राध्यापक प्राचार्य व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.