10 नोव्हेंबर ला आवर्तन सुटणार
पंढरपूर (प्रतिनिधी) - वीर भाटगर धरणातून नीरा उजवा कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार असून त्या लाभक्षेत्रातील 9 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे अशी माहिती आ समाधान आवताडे यांनी बोलताना दिली .
रब्बी हंगाम २०२३-२४ मधील खडकवासला, पवना,भामा, आसखेड, चासकमान प्रकल्प तसेच नीरा उजवा व डावा कालवा प्रकल्प सल्लागार समिती सदस्यांची व सिंचन पाण्याचे नियोजन या सदर संदर्भात विचारविनिमय बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री मा.ना.श्री.अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषद माजी सभापती श्री.रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व शासकीय व अशासकीय सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये निरा भाटघरचे पाणी वितरिका क्रमांक ७ मधून उंबरगाव-बोहाळी-कोर्टी या ओढ्याला पाणी सोडण्यात यावे जेणेकरून जवळच्या गावातील पाणी पुरवठा होत असणाऱ्या विहीरीस पाणी वाढून पिण्यास पाणी उपलब्ध होईल व रांझणी येथील पाझर तलाव भरून घेणे गरजेचे आहे .टेल टू हेड प्रमाणे तसेच D3मधून पाणी वितरीत करावे व सध्या तिसंगी तलावातील पाणी संपले असून लाभक्षेत्रातील गावांना पिण्याची पाण्याची टंचाई जाणवत आहे लोकांची ही अडचण जाणून घेऊन आ आवताडे यांनी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे समितीच्या व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे माझ्या विविध पाणी मागण्यांची कालवा समितीने दखल घेऊन व सकारात्मक प्रतिसाद देऊन येत्या १० नोव्हेंबर पासून पाणी देणेची कार्यवाही सुरू करण्याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले असल्याचे आ आवताडे यांनी सांगितले.
या बैठकीसाठी माजी मंत्री आ.दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, आ.शहाजीबापू पाटील, आ.राम सातपुते,धैर्यशील मोहिते पाटील आ. रविंद्र धंगेकर, माजी आमदार श्री.दीपक आबा साळुंखे-पाटील आदी मान्यवर व विविध शासकीय अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते