पंढरपूर (प्रतिनिधी) - दि. ६ सप्टेंबर रोजी शालेय स्तरावर टाटा बिल्डिंग इंडियातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर झाला. स्पर्धेमध्ये आपटे उपलप प्रशालेने घवघवीत यश संपादन केले. ही स्पर्धा दोन गटांमध्ये आयोजित केली होती. या निबंध सर्धेमध्ये विज्ञान, पर्यावरण इ. विषयांचा समावेश होता. लहान गटामधू कु. देवयानी दुपारगुडे, कु. जान्हवी नामदास व चि. दर्शन गंगेकर तसेच मोठ्या गटामध्ये कु अनुष्का पंचधारे, कु.रिद्धी हरिदास व चि. प्रसन्न गंगेकर यांनी यश संपादन केले.
सर्व विद्यार्थांना प्रशालेचे शिक्षक अनिल जाधव यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव बी जे डांगे सर, टाटा बिल्डिंगचे प्रतिनिधी अतुल गोसावी, प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रय धारुरकर सर , प्रशालेचे पर्यवेक्षक अनिल अभंगराव सर यांचे हस्ते प्रमाणपत्र व मेडल्स देऊन सन्मान करण्यात आले. यावेळी जेष्ठ शिक्षक श्री गुलाखे, श्री खरात, श्री एन पी डांगे सर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.