आ.समाधान आवताडे व आचार्य ज्ञानेश्वरमहाराज जोगदंड यांची प्रमुख उपस्थितीत होणार प्रदान
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूरचे सुपूत्र व थोर क्रांतीकारक कै.वसंतबाबाजी बडवे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा हिंदुत्व शौर्य पुरस्कार हिंदुराष्ट्रसेनेचे धनंजयभाई देसाई यांना घोषित झाला असून कै.बडवे यांच्या पुण्यस्मरणा दिनी दि.19 ऑक्टोंबर रोजीपंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार समाधानदादा आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र हिंदुसभेचे अध्यक्ष अनिलराव पवार, गोरक्षक सुधाकर बहिरवडे व क्रांतीवीर बडवे ट्रस्टचे अध्यक्ष अभयसिंह इचगाकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. देव, देश व धर्मासाठी लढणार्या हिंदुत्वनिष्ठ लढावु कार्यकर्त्यास प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यापुर्वी वारकर्यांचे लढावु नेते संतवीर बंडातात्या कराडकर, अफजलखानाच्या कबरीचे उदात्तीकरणा विरुध्द प्रखर लढा देणारे मिलींद एकबोटे, विरेंद्रसिंह तावडे, सुप्रसिध्द लेखक विचारवंत एस.एल.भैरप्पा, श्रीरामसेना कर्नाटकचे प्रमोद मुतालिक, धुळ्याचे हिरामण आपा गवळी, सांगलीचे स्व.नारायणराव कदम, समीर दरेकर, अभिनेते, वक्ते शरद पोंक्षे अशा मान्यवर लढावु हिंदुत्ववादयांना यापुर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या वर्षीचा पुरस्कार धनंजय भाई देसाई यांनी हिंदु समाजावरील आक्रमणे रोखण्यासाठी लहान वयात हिंदुराष्ट्रसेनेची स्थापना केली. संघटनेच्या वाढीसाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले व धर्माभिमानी कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. या संघटनेच्या माध्यमातून देशाविरुध्द धर्माविरुध्द काम करणार्यांना धडा शिनविणे. आक्रमक जातांध्य शक्ती विरुध्द हिंदु समाजाला संघटीत करणे. विविध आक्रमणा विरुध्द समाजात जनजागृती करणे, लव्हजिहाद, लॅन्ड जिहाद याला प्रतिबंध करणे अशा कार्यातून त्यांनी स्वताची ओळख निर्माण केली. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हिदुत्व शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

दि.19 ऑक्टोंबर गुरुवारी कवठेकर प्रशाला नाथ चौक पंढरपूर येथे साय.6 वाजता होणार्या या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे अवाहन पंढरपूर शहर हिंदुमहासभेचे अध्यक्ष बाळासाहेब डिंगरे यांनी केले आहे.