पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर येथील स्वानंद कला मंच, ज्येष्ठ नागरिक संघ व सखी स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघ या दोन्ही संघांनी एकत्रितपणे संगीत गुरु व स्वानंद कला मंचचे अध्यक्ष दिलीप टोमके यांचे मार्गदर्शनाखाली कला व मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करून जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना शिंदे गट जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्रीसंत एकनाथ महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले .अध्यक्षस्थानी ह भ प आप्पा महाराज होते. महेश साठे यांनी महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्येष्ठांसाठी राबविलेल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विशेष योजनांची माहिती महेश साठे यांनी देऊन आरोग्याच्या योजनांची सविस्तर माहिती दिली व ज्येष्ठांचा अनुभव व तरुणांची कार्य करण्याची क्षमता म्हणजेच युक्ती आणि शक्तीचा जर खऱ्या अर्थाने संयोग घातला तर देशाचे भवितव्य उज्वल झाल्याशिवाय राहणार नाही.
यानिमित्ताने जेष्ठ मंडळींच्या मनामधील भावना समजून घेण्याचा एक चांगला योग आला. त्याचबरोबर प्रत्येक तरुणाने आपल्या घरातील ज्येष्ठांबरोबर कमीत कमी दिवसातून एक तास तरी घालवला पाहिजे असे मत महेश नाना साठे यांनी व्यक्त केले .त्यानंतर दोन्ही कला मंचांच्या वय वर्ष ६० ते ८५ वयोगटातील कलाकारांनी भारतीय परंपरेतील संगीत अभंग, ओवी, गवळण, दिंडी, भारुड, नृत्य, गान, फिल्म संगीत इत्यादी कला प्रकारांचे सादरीकरण करून मनोरंजन केले.
यामध्ये सखी स्वानंदाच्या अध्यक्षा सुरेखाताई कुलकर्णी, जयाताई कुलकर्णी, सुधाताई मंजुळ, स्वानंदाचे अध्यक्ष दिलीप टोमके, उपाध्यक्ष शामराव कुलकर्णी, अशोक ननवरे, शोभा विश्वाचे, मीरा टोमके, प्रमोदिनी कुलकर्णी, रावण साहेब इत्यादी कलाकारांनी विविध कलाप्रकार सादर करून सर्वांचे मनोरंजन केले सदर कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव प्रकाश कुलकर्णी यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी परिश्रम घेतले.