केबीपी’मध्ये ४ नोव्हेंबर रोजी इंग्रजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

0
           पंढरपूर (प्रतिनिधी) - रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात रुसा काम्पोनंट आठ अंर्तगत  इंग्रजी विभागाच्या वतीने ‘वर्ल्ड लिटरेचर्स अँड कल्चरल स्टडीज’ या विषयावरती एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून ही परिषद दि. ४ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन त्रिभुवन युनिव्हर्सिटी, काठमांडू नेपाळ येथील लिटररी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी प्रो. डॉ. खूम प्रसाद शर्मा हे करणार आहेत.  तसेच यूनिवर्सिटी ऑफ केलानिया श्रीलंका येथील इंग्रजी विभाग प्रमुख प्रो.डॉ. शशिकला अस्सेला व  डॉ. जय सिंग, असोसिएट प्रोफेसर, इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी, हैदराबाद हे तज्ञ व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘जागतिक साहित्य व सांस्कृतिक अभ्यास’ या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.  
         या आंतरराष्ट्रीय परिषदेला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक राज्यातून प्राध्यापक व संशोधक उपस्थित राहून आपल्या संशोधन पेपरचे वाचन करणार आहेत. सदर परिषदेत सोलापूर इंग्लिश टीचर्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक कदम, सेक्रेटरी डॉ. सचिन लोंढे व इतर पदाधिकारी सहभागी होणार आहेत. प्रा.डॉ.एनी जॉन,  प्रा. डॉ. विष्णू पाटील, प्रा. डॉ. राजेश येवले हे वेगवेगळ्या सत्राचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयातील इंग्रजी साहित्य आणि संस्कृतीच्या अभ्यासकांनी  या परिषदेमध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन ही त्यांनी केले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेचे निमंत्रक प्रा. डॉ. समाधान माने, समन्वयक प्रा. डॉ. धनंजय साठे, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्रा. धनंजय वाघदरे, रुसा समिती समन्वयक प्रा. योगेश पाठक, प्रा. डॉ. चंद्रकांत काळे, कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी, प्रा. सुहास शिंदे, प्रा. कुबेर गायकवाड, प्रा. सोमनाथ व्यवहारे, प्रा. प्रवीण शिंदे पाटील, प्रा. सैफअली विजापुरे, प्रा. श्रीधर रेवजे, प्रा. राजेंद्र मोरे, अभिजित जाधव, सुरेश मोहिते, आदी शिक्षक शिक्षकेतर सेवक परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)