पंढरपूर दि. 29 : - किमान समान शिबिरा अंतर्गत तालुका विधी सेवा समिती पंढरपूर व अंबिका योग कुटीर ,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिन जिल्हा न्यायाधीश श्री.एम. बी. लंबे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
आजच्या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त जीवन जगणे अवघड काम वाटते. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे आणि चिंतेने आपले जीवन जगत आहे. माणसाने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिन हा जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश एम.बी. लंबे यांनी केले.
सदर शिबिरास अंबिका योग कुटीर ठाणे पदाधिकारी तसेच न्यायालयीन कर्मचारी जीवन सुरवसे उपस्थित होते.