पंढरपूर (प्रतिनिधी) - फिनोलेक्स पाईप्स तसेच स्वराज्य पोलीस मित्र संघटना व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने व आयोजक हरिकृपा डिजिटल श्रीराम बडवे यांच्या वतीने पंढरपूर शहरात "कर्तव्यपूर्ती सन्मान सोहळा" पार पडला. फिनोलेक्स पाईप्सचे जनरल मॅनेजर श्री. विश्वजीत हरूगडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे अध्यक्ष दीपकजी कांबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला, याप्रसंगी फिनोलेक्स पाईप्स सोलापूरचे मॅनेजर श्री. गोपाळ आदोने, अजित खटावकर व सोलापूर जिल्ह्यातील फिनोलेक्स पाईप्सचे सर्व अधिकृत वितरक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा उद्देश पंढरपूर "आषाढी यात्रा 2023, अधिक महिना व श्रावण महिना" या कालावधीत प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट कार्याचा व कर्तुत्वाचा सन्मान करणे यांचा तसेच इतर सरकारी अधिकारी महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांना उत्कृष्ट सेवा सुविधा पुरवून यांची पंढरपूर यात्रा आनंदाने पार पडली त्या निमित्ताने विविध विभागातील आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणारे सर्व सरकारी अधिकारी पोलीस स्टेशन, पंढरपूर नगरपरिषद, श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पोलीस प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, प्रांत कार्यालय तहसील कार्यालय, पंचायत समिती या विविध क्षेत्रातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपले कार्य कर्तव्य निष्ठेने पार पाडली व सलग ही यात्रा आषाढी यात्रा, अधिक महिना, लाखो भाविकांना सेवा सुविधा दिली व निर्विघ्न यात्रा पार पाडली त्याबद्दल अशा कर्मचारी व अधिकारी व प्रशासन यांचा कर्तव्य प्रति सन्मान सोहळा फिनोलेक्स पाईप्स व स्वराज्य पोलीस मित्र संघटना व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना व यांच्या संयुक्त विद्यमानाने व श्रीराम बडवे हरिकृपा डिजिटल आयोजक यांच्या वतीने हा सोहळा घेण्यात आला होता.
या सोहळ्यासाठी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग, पोलिस अधिकारी उपस्थित होते. तसेच सोलापूर जिल्हा पदाधिकारी नाशिकहून आलेले पदाधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्या करीता संघटनेचे पदाधिकारी विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख सौ.धनश्रीताई उत्पात विश्वस्त तथा प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र, प्रसिद्धीप्रमुख उमेशजी काशीकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष दिनेशजी काटकर, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सौ डॉ. ज्योती शेटे मॅडम, तालुका अध्यक्ष उमेश ढोबळे तालुका कार्याध्यक्ष कैलास कारंडे, बाळासाहेब कांबळे, हेमंत भाळवणकर, संतोष चव्हाण, किशोर काकडे, राहुल उजगारे, अरुण अटकळी, सतीश जाधव व ऋतुजा उत्पात यांनी योग्य नियोजन केले.