खर्डी ता. पंढरपूर (प्रतिनिधी) :-
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आंदोलन सुरू केले असून या आंदोलनामध्ये गावोगावी मराठा युवकांनी पुढार्यांना गावबंदी केली असून पुढाऱ्यांवर आपले नियोजित कार्यक्रम सोडून घरी बसण्याची वेळ आली आहे परंतु याला बगल देत आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे भाजपाचे नेते सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगोला येथे कार्यक्रमाला जात असताना खर्डी येथील मराठा आंदोलकांशी आरक्षणासंदर्भात चर्चा केली मराठा समाज बांधवांनी आमच्या भावना आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवा अशी मागणी केली.
मराठा समाजाच्या समाज बांधवांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्यात जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असे मत भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी व्यक्त केल्याने खर्डी येथील मराठा समाजाच्या सर्व सहकाऱ्यांनी आभार मानले.