कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ

0
            श्रीपूर (ता. माळशिरस) येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३ २४ गळीत हंगामाची उत्साहात सुरुवात झाली.
           युटोपियन शुगरचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक व पांडुरंगचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सालविठठ्ल यांचे हस्ते गव्हाणीचे पुजन करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गव्हणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
        प्रथम कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी चेअरमन प्रशांतराव परिचारक, युटोपिअन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक, पांडुरंगचे उपाध्यक्ष कैलास खुळे, जेष्ठ संचालक दिनकरभाऊ मोरे, दिलिपराव चव्हाण, वसंतनाना देशमुख, दाजी पाटील, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमार, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरु वाघमारे, गंगाराम विभूते, हणमंत कदम, दिलिप गुरव, सुदाम मोरे, किसन सरवदे, विजय जाधव, शामराव साळुंखे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
          यावेळी माहिती देताना कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी साखर कारखान्याच्या साखरेची एम एस पी कित्येक वर्षापासून ३१०० रुपये प्रति क्विंटल इतकीच आहे ही वाढवणे अत्यंत आवश्यक असून ३७०० प्रतिक्विंटल इतकी एम एस पी होणे गरजेचे आहे तरच कारखान्याचे आर्थिक गणित बसून जास्तीत जास्त ऊस दर शेतकऱ्यांना देणे सोयीचे होणार आहे. चेअरमन प्रशांत परिचारक यांनी गतवर्षीच्या ऊसाला सर्वाधिक २७५१ रु. दर दिला हा एफ. आर पी. पेक्षा जास्त असून यावर्षी कारखान्याने मिल, बॉयलर विभागाची कार्यक्षमता वाढवल्याने यंदा साडे आठ हजार ते नऊ हजार मे. टनाने गाळप करण्यात येणार असून उपलब्ध ऊसाचे वेळेत गाळप केले जाणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)