मनस्वी फुड आणि मसाल्यामुळे जेवणाची चव लज्जतदार होणार - युवानेते प्रणव परिचारक

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) - दैनंदिन जीवनात पालेभाज्याला महत्त्व असून त्या अधिकाधिक चविष्ट होण्यासाठी मनस्वी मसाले या लघुउद्योगामार्फत तयार करण्यात येणाऱ्या मसाल्यामुळे जेवणाची चव लज्जतदार होणार आहे. हॉटेल पेक्षाही चवदार अशा भाज्या कमी वेळात गृहिणींना तयार करता येतील असे प्रतिपादन युवानेते प्रणव परिचारक यांनी केले.
         मनस्वी फुड आणि मसाले बनवणाऱ्या मशनरीचे उद्घाटन विजयादशमीच्या मुहूर्तावर युवानेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
        या प्रसंगी बोलताना युवा नेते प्रणव परिचारक म्हणाले की, महिलांनी नोकरीच्या मागे न लागता विविध व्यवसायात प्रगती करून इतरांना मदतीचा हात उद्योग रूपाने द्यावा.  मनस्वी फूड व मसाल्याच्या शितल खटावकर यांनी सुरू केलेल्या लघुउद्योगला  शुभेच्छा देताना त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला.  लघुउद्योगामर्फत सुरू केलेल्या नव्या व्यावसायास सर्वतोपरी मदत करू असेही प्रणव परिचारक यांनी सांगितले.

        विविध क्षेत्रांमध्ये महिला उद्योजकाने पुढे येणे गरजेचे आहे: त्यांच्या कार्यास व नवीन व्यवसायास शुभेच्छा आहेत असे भास्कर कसंगावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
        यावेळी  रणजीत जाधव, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे, डॉक्टर श्रीकांत खटावकर, सौ खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते. या नवीन व्यवसायास अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका उपाध्यक्ष तसेच उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)