आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋ्षी जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) - आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋ्षी जयंती निमित्त समस्त कोळी समाज श्रीपुंडलिक व महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने समाजाच्या दिनदयाळ मंदिर कार्यालयात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख साईनाथभाऊ अभंगराव यांचे हस्ते शनिवार दिनांक 28 रोजी महर्षी वाल्मिकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
           कार्यक्रमास ट्रस्टचे विश्वस्त उमेश संगितराव, अनिल मनोहर अभंगराव, सोनू अधटराव, दत्तात्रय कांबळे, माजी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, उत्तम परचंडे, मारुती संगितराव, कुमार संगितराव आदी व कोळी बांधव उपस्थित होते.
            तसेच येथील  आपटे उपलप प्रशालेत आद्यकवी महर्षि वाल्मिक जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक दत्तात्रेय धारुरकर यांचे हस्ते करण्यात आज आले.
        यावेळी पर्यवेक्षक अनिल अभंगराव, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महादेव कांबळे, नरेंद्र डांगे,संतोष करकमकर,आबा खरात, राहुल भातलवंडे,अजित कुरे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)