मंगळवेढा (प्रतिनिधी) - सन २०१८-१९ मध्ये मंगळवेढा तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळामुळे चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यावेळच्या ६० चारा छावणी चालकांचे जवळपास १२ कोटी रुपये बीले शासनाकडे आज ही प्रलंबित आहे ते लवकर मिळावे यासाठी चारा छावणी चालकांसमवेत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील यांची भेट घेऊन सदर छावणी चालकांचे बिल लवकरात लवकर अदा करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन दिले.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून चारा छावणी बिले शासन दरबारी प्रलंबित असल्याने या छावणी चालकांची खूप मोठी अर्थिक कुचुंबना होत आहे. छावणी चालकांच्या या मागणीवर आमदार अवताडे यांनी यापूर्वीही वेळोवेळी पाठपुरावा व निवेदनाच्या माध्यमातून तसेच विधानसभा सभागृहाच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये चारा छावणी चालकांची रखडलेली बिले मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तत्कालीन दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये तालुक्यातील पशुधन व पशुपालक यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या छावणी चालकांनी खूप मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. त्यामुळे त्यांना बिले मिळण्यात असणाऱ्या त्रुटी लवकरात लवकर दूर करून अदा करण्यात यावीत असे आमदार आवताडे यांनी मंत्री महोदय यांच्याकडे मागणी केली आहे.
त्या सर्व चारा छावण्या चालकांकडून व्यवस्थितपणे चालवण्यात ही आल्या होत्या. पण तालुक्यातील चारा छावणी चालकांचे अनुदान शासनाकडे आज ही प्रलंबित आहे, यासंदर्भात चाराछावणी चालकांसमवेत आमदार आवताडे यांनी मंत्री महोदयांची भेट घेत चर्चा केली व तात्काळ प्रलंबित अनुदान/बीले मंजूर करावीत याकरिता निवेदन दिले. तसेच यावेळी मतदारसंघातील विकासात्मक बाबींच्या इतर महत्त्वाच्या विषयांवर देखील आमदार आवताडे यांनी मंत्री ना. पाटील यांच्यासमवेत छावणी चालकांच्या उपस्थितीमध्ये चर्चा केली.
Bमंत्री महोदय यांच्या समवेत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे छावणी चालकांची प्रलंबित बिले लवकरात लवकर त्यांच्याकडे अदा केली जातील विश्वास यावेळी आमदार आवताडे यांनी व्यक्त केला. यावेळी मंगळवेढा तालुक्यातील चाराछावणी चालक बैठकीस उपस्थित होते.