पंढरपूर (प्रतिनिधी) - जुने माळी गल्लीतील श्रीसंत एकनाथ भवनात वै. भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे तृतीय पुण्यस्मरण (तिथीनुसार) गुरुवार; दि. २६/ १० / २०२३ रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. तदनिमित सायंकाळी ठीक ५ वाजता ह.भ.प. श्री.चैतन्य महाराज देगलूरकर यांचे "दोन आप्पांविषयी.... एक गुरु- स्वामी वरदानंदभारती, शिष्य - वै. भागवताचार्य वा. ना. उत्पात" या विषयांवर आपल्या अमोघ वाणीतून प्रवचन सेवा होणार आहे.
या कार्यक्रमास ह. भ. प. प्रसाद महाराज अमळनेरकर, ह. भ. प. शंकर महाराज बडवे, ह. भ. प. मदन महाराज हरिदास, ह. भ. प. कैवल्य महाराज चातुर्मासे, समिहन महाराज आठवले आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भागवताचार्य वै. ह. भ. प. वा. ना. उत्पात स्नेह परिवार यांचे वतीने करण्यात येत आहे.