सोलापूर (प्रतिनिधी) : श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त कोजागिरी पौर्णिमेसाठी लाखो भाविक सोलापूर तुळजापूर रस्त्यावरून पायी चालत जातात. त्यासाठी गुरुवार दिनांक 26 ऑगस्ट ते रविवार दिनांक 29 ऑगस्ट हे चार दिवस सोलापूर तुळजापूर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त राजेंद्र माने आणि पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी घेतला आहे.
श्रीक्षेत्र तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दि. १५/१०/२०२३ ते दि. ३०/१०/२०२३ पावेतो साजरा होत आहे.
दि. २८/१०/२०२३ रोजी कोजागिरी पोर्णिमा व दिनांक २९ / १० / २०२३ रोजी मंदिर पोर्णिमेनिमित्त सोलापूर शहर, सोलापूर जिल्हयातील तसेच कर्नाटक राज्यातून मोठया संख्येने भाविक तुळजापूरकडे पायी चालत जात असल्याने वाहतुकीची कोंडी होवु नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता भाविक पायी चालत जाणारे मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविणे करीता पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी दिनांक २४/१०/२०२३ रोजी वाहतुक नियमन जाहीरनामा निर्गमीत केला आहे.