आपटे उपलप प्रशालेत शैक्षणिक शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप

0
         पंढरपूर दि. 25 (प्रतिनिधी) - येथील आपटे उपलप प्रशालेत आज महाराष्ट्र शासनाची सन २०२१-२२ सालाची आदिवासी विद्यार्थ्यांची सुवर्ण महोत्सवी शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या रकमेचे धनादेश इयत्ता ५ वी ते १० च्या २२ आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री दत्तात्रेय धारुरकर, पर्यवेक्षक अनिल अभंगराव, संस्था सदस्य N P डांगे यांचे हस्ते देण्यात आले.

          यावेळी प्रशालेचे शिक्षक बंडोपंत गुलाखे, संतोष करकमकर, गणेश गंगेकर व वाल्मिक आदिवासी विकास संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ अभंगराव, संजय माने, दादा करकमकर, उमेश तारापूरकर आदी व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)