पंढरपूर (प्रतिनिधी) :- वारकरी संप्रदाय परंपरेतील थोर संत शांतीब्रह्म श्रीएकनाथमहाराज यांच्या जलसमाधीस 425 वर्षे तर एकनाथी भागवत ग्रंथास 450 वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत योगाप्रित्यर्थ 450 वर्षांपूर्वी नाथमहाराज व ‘भागवत ग्रंथाचा सन्मान’ काशीक्षेत्री झाला. त्याच पद्धतीने व त्याच स्मृती जागवण्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अश्विन शुद्ध 1, घटस्थापना नवरात्रारंभ या शुभदिनी दि. 15/10/2023 सकाळी ठिक 9 वा. ग्रंथकौस्तुभ श्रीएकनाथी भागवत गजारुढ ‘ग्रंथ’ दिंडी सोहळा होणार आहे. ह्या दिंडी सोहळ्याची सुरुवात श्रीसंत नामदेवमहाराज पायरी पासून होऊन संपूर्ण प्रदक्षिणा मार्गे निघेल.
तसेच तसेच सायं. 5 वा. संतपूजन सोहळा होणार आहे.
या संत पूजन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती तथा आशिर्वाद श्रीसंत एकनाथमहाराजांचे विद्यमान वंशजांसह सकलसंतांचे वंशज, पंढरपूर येथील सर्व मान्यवर फडकरी, मठाधिपती, संस्थानिक, सर्व वारकरी शिक्षण संस्था तसेच चातुर्मास वारकरी साधक यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे.