पंढरपूर (प्रतिनिधी) - सरकारने चलनातुन माघारी घेतलेल्या रु.२०००/- च्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठविण्याची व रक्कम खात्यात जमा करण्याची सुविधा सर्व टपाल कार्यालयामध्ये उपलब्ध असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष व पोस्ट फोरमचे सदस्य शशिकांत हरिदास यांनी दिली.
केंद्र शासनाने रु.२०००/-च्या नोटा चलनातून माघारी घेतल्या व त्या सर्व नोटा बॅंकेद्वारे बदलून किंवा खात्यात जमा करण्यासाठी ७ आक्टोबर २०२३ ही अंतिम मुदत दिली होती. त्याप्रमाणे नागरिकांनी त्या नोटा बदलून घेतल्या. आता ती मुदत संपली असल्याने अद्यापही ज्यांच्या २०००/-च्या नोटा बदलून घ्यावयाच्या आहेत त्यांच्यासाठी रिझर्व्ह बँकेने देशातील त्यांच्या मुंबई, नागपूर सह १९ कार्यालयात स्वीकारुन ती रक्कम संबंधित व्यक्तीच्या खात्यावर जमा करण्यासाठी देशभरातील टपाल कार्यालयामार्फत सोय उपलब्ध करून दिली आहे. तरी नागरीकांनी आपल्याकडे असलेल्या २०००/-च्या नोटा रिझर्व्ह बँकेने दिलेल्या नमुन्यातील अर्जासोबत जोडून त्यांनी दिलेल्या कार्यालयाकडे पाठवुन रक्कम आपल्या पोस्ट किंवा बँकेच्या खात्यात जमा करून घ्यावी असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत उपाध्यक्ष भालचंद्र पाठक, कोषाध्यक्ष विनोद भरते, सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक दीपक इरकल, सचिव सुहास निकते तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, संघटक महेश भोसले, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, प्रा.धनंजय पंधे, सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर संजय खंडेलवाल, सागर शिंदे यांनी केले आहे.