पंढरपूर (प्रतिनिधी) - गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील प्रा. नीता प्रेमकुमार कुलकर्णी यांना ‘डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ फ्लेग्झीबल मल्टी इनपुट अँड मल्टी आऊटपुट (एमआयएमओ) अँटेना फॉर फाईव्ह-जी एप्लिकेशन्स’ या विषयात नुकतीच पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला शोधप्रबंध कोल्हापूर मधील संजय घोडावत विद्यापीठामध्ये सादर केला होता. पीएच.डी. प्राप्त केल्यामुळे डॉ. नीता कुलकर्णी यांचा स्वेरीतर्फे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांच्या हस्ते आणि स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने, डॉ. आर.एम.लिनस व डॉ.एन.बी.बहादुरे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली व विभागातील इतर प्राध्यापकांच्या तसेच परिवारातील सदस्यांच्या सहकार्याने प्रा.नीता कुलकर्णी यांनी पीएच.डी. पूर्ण केली. ‘फ्लेग्झीबल अँटेना’ विकसित करण्यासंदर्भात त्यांनी संशोधन केले आहे. डॉ. नीता कुलकर्णी ह्या स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये गेल्या १४ वर्षापासून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. त्यांचे अनेक संशोधनपर लेख हे आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून प्रकाशित झालेले आहेत. ‘स्वेरी’ या संस्थेच्या नावातच 'रिसर्च' हा शब्द असल्याने सुरुवातीपासूनच स्वेरीमध्ये संशोधनास प्रोत्साहन दिले जाते. स्वेरीमध्ये असणारे संशोधनपूरक वातावरण, विविध संस्थासोबत असणारे सामंजस्य करार, उपलब्ध असणाऱ्या विविध संशोधनपर प्रयोगशाळा या सर्व बाबींमुळे स्वेरीतील वातावरण हे संशोधनास अतिशय पोषक बनले आहे. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे स्वेरीतील पीएच.डी.प्राप्त प्राध्यापकांची संख्या वरचेवर वाढत आहे. प्रा. नीता कुलकर्णी यांना पीएच.डी.पदवी मिळाल्यामुळे स्वेरीत पीएच.डी. धारकांची संख्या वाढली असून आता स्वेरीत पीएच.डी.प्राप्त ३७ प्राध्यापक कार्यरत आहेत तर सुमारे ३० प्राध्यापकांची पीएच. डी. सुरु आहे. ‘परिवार आणि शिक्षण’ या दुहेरी व्यापामधून प्रा. नीता कुलकर्णी यांनी अथक परिश्रमाने पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पीएच.डी. प्राप्त केल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, इतर पदाधिकारी व विश्वस्त, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, स्वेरी संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. नीता कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.