श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पहिली उचल प्रति मे.टन रू. २५५०

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा ४२ वा गळीत हंगाम शुभारंभ   विजया दशमीचे शुभमुहूर्तावर सकाळी १० वाजता मनोरमा सह. बँकेचे चेअरमन श्री श्रीकांत मोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शोभाताई मोरे, एम.एस.सी. बँकेचे माजी सदस्य श्री अविनाश महागांवकर, जकराया शुगरचे चेअरमन श्री बिराप्पा जाधव व कारखान्याचे जेष्ठ सभासद श्री हरी पाटील, श्री खंडू सुरवसे, श्री सुखदेव हाके, श्री औदुंबर पोरे, श्री वसंत वाघ, श्री दगडू भोसले, श्री बब्रुवान भोसले आदी मान्यवरांच्या शुभहस्ते व श्री संतोषभाऊ नेहतराव, श्री धनंजयनाना कोताळकर, श्री प्रताप गंगेकर, महादेव धोत्रे, निलेश आंबरे, लखन चौगुले, प्रथमेश पाटील, चंद्रशेखर कोंडूभैरी, सुधीर धुमाळ, नागेश गंगेकर, अरुण कोळी, बालाजी मलपे, संतोष पवार, शिवाजी मस्के, ऋषीकेश भालेराव, काका पवार, आदित्य फत्तेपूरकर व कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
        यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील म्हणाले की, गेल्या वर्षी सभासद शेतकऱ्यांनी आशिर्वाद दिल्याने परिवर्तन घडून आले, आम्ही दुसरा गळीत हंगाम यशस्वीपणे चालू करीत आहोत. आपला कारखाना चालू झाल्यामुळे जिल्ह्यात ऊस दराची स्पर्धा निर्माण झाली, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना जास्तीत जास्त दर देणे भाग पडले. यावर्षी आपल्या कारखान्याकडे ३७००० एकर ऊसाची नोंद झाली असून तोडणी वाहतुक यंत्रणा टायर बैलगाडी, डंपींग ट्रॅक्टर व मोठया ट्रॅक्टरचे असे एकुण १००० वाहनांचे करार झालेले आहेत. मशिनरीची देखभाल व दुरुस्ती करुन कारखाना गाळपासाठी सज्ज आहे. तरी सभासदांनी आपला सर्व ऊस इतर कारखान्यास न देता आपल्या श्री विठ्ठल कारखान्यास दिल्यास मागील हंगामा पेक्षा ही जास्त गाळप होईल. आपल्या कारखान्याचा वजन काटा चोख असून जिल्ह्यातील इतर कोणताही साखर कारखाना काटयावर बोलत नाही.
          याप्रसंगी गळीत हंगाम २०२३ २४ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास प्र.मे.टन २५५०/- रुपयेची पहिली उचल जाहीर करण्यात आली. सर्व ऊस उत्पादक शेतकरी व सभासद जास्तीत जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त केला. मागील हंगामात गळीतास आलेल्या ऊसास यापूर्वी प्र.मे.टन २४०० /- रुपये या प्रमाणे अदा केलेले असून दिवाळी सणासाठी उर्वरीत १००/- रुपयेचा अंतीम हप्ता व सवलतीच्या दरात सभासदांना साखर देण्यात येणार आहे. तसेच कारखाना आर्थिक अडचणीत असतानासुध्दा कर्मचाऱ्यांना दिलासा देणेसाठी व त्यांची दिवाळी सण गोड होणेसाठी १५ दिवसाचा पगार बोनस व ११ दिवसाचा पगार बक्षीस म्हणून देणार असल्याचे सांगितले.
        उजनी धरण ६० टक्के भरले असून त्यामध्ये ९५ टी.एम.सी. पाणी साठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाणी साठयातून ४ पाळया सोडणेबाबत शासनास निवेदन देणेत आले होते. सदर निवेदनाची शासनाने दखल घेवून दि.२०.१०.२०२३ रोजीचे कालवा सल्लागार समितीचे मिटींगमध्ये २ पाळ्या पाणी सोडण्याचे नियोजन करुन १ नोव्हेंबरपासून पहिली पाळी सोडणेत येणार आहे. तसेच निरा भाटघर कॅनॉलला टेल टू हेड १ आवर्तन देणेचे व तिसंगी- सोनके तलावातही पाणी सोडणार असल्याचे सांगितले. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता मागेल त्याला शेततळे ही शासनाची योजना असून त्या योजनेचा लाभ घेणेसाठी जास्तीत जास्ती शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करुन शेततळी पाडून घ्यावेत व शेततळी भरून घेवून सदस्थितीत पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे, पाण्याची बचत करणेसाठी सर्व शेतकऱ्यांनी शेतीसाठी ठिबक सिंचन योजनेचा वापर करावा असे त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. कारखान्यास आर्थिक सहकार्य केलेबद्दल एम.एस.सी. बँक, लोकमंगल बँक, मनोरमा बँक व जकराया शुगर यांचे आभार व्यक्त केले.
       सदर प्रसंगी मनोरमा बँकेचे चेअरमन श्री श्रीकांत मोरे बोलताना म्हणाले की, या कारखान्याचा इतिहास फार मोठा असून कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील हे ४ ते ५ साखर कारखाने चालवित असल्यामुळे त्यांच्या अनुभवाच्या जोरावर या कारखान्यास गतवैभव प्राप्त करुन देतील. सदर प्रसंगी एम.एस.सी. बँकेचे माजी सदस्य श्री अविनाश महागावकर बोलताना म्हणाले की, या कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा असताना हे कारखाना चालविणेचे धाडस चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील यांनी केलेबद्दल त्यांचे कौतुक केले व पंढरपूरची बाजार पेठ पुन्हा फुलवतील अशी अशा व्यक्त केली.

        याप्रसंगी जकराया शुगरचे चेअरमन श्री बिराप्पा जाधव म्हणाले की, श्री अभिजीत पाटील हे माझ्या मित्राचा मुलगा असून, शेतकरी कुटुंबातील व्यक्ती हा ज्या वेळेस उच्च पदावर जावून बसतो, त्यावेळी शेतकऱ्यांचा विकास होतो त्यामुळे हा कारखाना चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील हे उत्तम प्रकारे चालवतील असे विचार त्यांनी व्यक्त केले.

       सदर प्रसंगी तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख व शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष श्री सुधीर धुमाळ म्हणाले की, श्री विठ्ठल कारखाना हा महाराष्ट्रात नावजलेला कारखाना आहे. हा कारखाना चेअरमन श्री अभिजीतआबा उत्तम प्रकारे चालवतील, यापुढे भविष्यामध्ये त्यांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ देऊ, असे ते म्हणाले.

        यावेळी बोलताना श्री आदित्य फत्तेपुरकर म्हणाले की, श्री विठ्ठल कारखाना आपल्या हक्काचा कारखाना असून शेतकऱ्यांचा राजवाडा आहे. सदर कारखाना टिकणेसाठी चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील यांचे पाठीशी सर्वांनी उभे राहाणेचे आवाहन केले.

         सदर प्रसंगी सर्वश्री नागेश गंगेकर, संतोष पवार, संतोष नेहतराव, बालाजी मलपे, डी.एस. पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

       स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे कार्यलक्षी संचालक श्री तुकाराम मस्के सर यांनी केले, तर कारखान्याचे संचालक श्री दिनकर चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

        या कार्यक्रमासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव श्री बी.पी. शेंगेसर, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, दत्तात्रय नरसाळे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, तानाली बागल, सचिन शिंदे-पाटील, समाधान गाजरे, धनाजी खरात, उमेश मोरे, गणेश ननवरे कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड, तसेच एम. एस. सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे एम. डी. श्री अमर पाटील, कारखान्याचे माजी संचालक, पंढरपूर व मंगळवेढा नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)