खंडग्रास चंद्रग्रहणामुळे श्रींच्या नित्योपचारात बदल…….

0
कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके व सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ औसेकर यांची माहिती

        पंढरपूर (प्रतिनिधी) :- आश्विन शुध्द 15, शनिवार दि. 28 ऑक्टोबर, 2023 रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आपल्या देशात दिसणार असल्याने श्रींच्या नित्योपचारामध्ये व दर्शनाच्या वेळेत दि.29 ऑक्टोंबर, 2023 रोजी बदल होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शेळके व सह अध्यक्ष श्री. गहिनीनाथ औसेकर यांनी दिली.

      त्यामध्ये ग्रहणाचे वेध दि. 28/10/2023 रोजी दु.03.14 पासून दि. 29/10/2023 रोजी पहाटे. 2.23 पर्यंत राहतील. ग्रहण स्पर्श रात्रौ 01.05, मध्य रात्रौ 01.44 व मोक्ष रात्रौ 02.23 वाजता आहे. त्यामुळे ग्रहण स्पर्श (रात्रौ.01.05 मि.) झालेनंतर व ग्रहण मोक्ष (रात्रौ 02.23 मि.) झालेनंतर श्रीविठ्ठल व श्रीरूक्मिणी मातेस, सर्व परिवार देवतांना श्री. चंद्रभागा (भीमा) नदीचे पाणी आणून स्नान घालण्यात येणार आहे. 

       तसेच दि. 28/10/2023 रोजी रात्रौ 11.00 ऐवजी 1.00 पर्यंत दर्शन सुरू राहील व तदनंतर शेजारती रात्रौ 12.00 ऐवजी पहाटे 3.00, काकडा आरती पहाटे 4.00 ऐवजी 5.00 वा., व दर्शन सकाळी 6.00 ऐवजी 7.00 वाजता सुरू होणार आहे. सदर बदलाची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)