पंढरपूर तालुक्यात 'प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे' उद्घाटन

0
ग्रामपंचायत स्तरावर कौशल्य विकास केंद्र सुरू

          पंढरपूर दि.19 :- प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत शहराकडे होत असलेले स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे व स्थानिक पातळीवरच युवकांना रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावेत याकरता ग्रामपंचायत स्तरावर कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत आहेत. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील आयोजीत कार्यक्रमात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभासी प्रणालीव्दारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा अभासी प्रणालीव्दारे उपस्थित होते. 
      लक्ष्मी टाकळी (ता.पंढरपूर) येथे प्रथमेश, मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमास अण्णा साठे प्रशाला, विद्या विकास प्रशाला, दगडोजीराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय, टाकळी, उमा महाविद्यालय,पंढरपूर तसेच वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी  तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते .
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात कौशल्यावर आधारित शिक्षण आणि त्यातून उद्योग निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी कौशल्य आधारित प्रशिक्षणातून उत्पादनक्षम युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्याच्या हेतूने आता राज्यात शासनाने गावोगावी प्रमोद महाजन ग्रामीण विकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी, बारावी, पदवी पर्यंत शिक्षण झालेल्या तरुण- तरुणींना विविध कोर्सेस या ठिकाणी शिकविले जाणार आहेत हे सर्व कोर्सेस संपूर्णतः मोफत शिकवले जाणार आहेत.  
    जिल्ह्यातील 24 ठिकाणी ग्रामीण प्रशिक्षण केंद्राचा समावेश असून यामध्ये नागणसूर, जेऊर, (ता.अक्कलकोट), पांगरी, मळेगांव (ता. बार्शी), जेऊर, वांगी, (ता.करमाळा), टेंभूर्णी, मोडनिंब (ता. माढा), यशवंतनगर, माळीनगर, खंडाळी (ता.माळशिरस), संत दामाजीनगर, भोसे (ता.मंगळवेढा), कुरूल, पेनूर (ता.मोहोळ),करकंब, कासेगांव, लक्ष्मी टाकळी (ता.पंढरपुर), महूद बु, कोळा,  (ता.सांगोला) नानज, दारफळ बीबी (ता.उत्तर सोलापुर), कुंभारी, मंद्रुप (दक्षिण सोलापुर) अशा विविध ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
           पंढरपूर तालुक्यातील तरुण-तरुणींना आवश्यक तांत्रिक कौशल्य प्राप्त करून अधिक सक्षम होण्यासाठी याचा लाभ होणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)