आनंदाचा शिधा देणारे सरकार म्हणजे सर्वसामान्यांचा आधार
पंढरपूर (प्रतिनिधी) - देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशभरातील करोडो माता भगिनींना दिवाळी- दसरा सणापूर्वी भेटवस्तू दिल्याचे प्रणव परिचारक यांनी यावेळी आनंद व्यक्त करत देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचे आभार व्यक्त केले आहे.
यावेळी बोलताना प्रणव परिचारक म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एलपीजी सबसिडी ₹२०० वरून ₹३०० पर्यंत वाढवली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ₹६०० मध्ये एलपीजी सिलिंडर मिळणार आहे. त्यामुळे हजारो महिला भगिनींची यंदाची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना लाभ होणार असून मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत देखील यावेळी होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे महिला वर्गाकडून जोरदार स्वागत केले जात असून महिला भगिनींनीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ पदार्थाचा समावेश होता. मात्र आता यंदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर यामध्ये दोन पदार्थांची भर पडली आहे. या शिधा वाटपात मैदा आणि पोह्याचा देखील आता समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत एकूण ५३० कोटी १९ लाख रुपयांचा निधी आनंदाचा शिधा वाटपासाठी खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. अशी महिती युवक नेते प्रणव परिचारक यांनी दिली.