मंगळवेढा (प्रतिनिधी) - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा तालुक्यातील
हिवरगाव व ब्रह्मपुरी या ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध तर खडकी, लक्ष्मी दहिवडी आणि नंदूर अशा तीन ग्रामपंचायत संस्थामध्ये सहा सदस्य बिनविरोध झाल्याने तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर आमदार आवताडे यांचे वर्चस्व पुनश्च सिद्ध झाले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील होऊ घातलेल्या २७ ग्रामपंचायती पैकी अर्ज काढून घेण्याच्या शेवटच्या दिवशी हिवरगाव, ब्रह्मपुरी या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध तर लक्ष्मी दहिवडी ग्रामपंचायत मध्ये आमदार आवताडे गटाच्या चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच नंदुर आणि खडकीचे प्रत्येकी एक ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत संस्थांवर पकड आणखी घट्ट करुन आमदार समाधान आवताडे यांनी सर्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दमदार सुरुवात केली. बिनविरोध निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा व लोकनियुक्त सरपंच यांचा जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे आमदार आवताडे यांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
आज झालेल्या बिनविरोध निवडीमध्ये ब्रम्हपुरी सरपंच पदासाठी स्नेहलता संजय पाटील तर ग्रामपंचायत सदस्य भवन सविता मधुकर कोकरे, राजेंद्र शामराव पाटील, संदीप दिनकर पाटील, अश्विनी तुकाराम पुजारी, रोशनी राजेंद्र कोकरे, बाळासाहेब केराप्पा सोनवले, हौसाबाई विलास पाराध्ये, श्वेता मनोज चव्हाण, अमोल नागनाथ देशमुख, सिंधू महादेव चव्हाण, रणजीत अशोक पाटील तसेच हिवरगाव ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवार कमल रविकांत खांडेकर या बिनविरोध झाल्या तर मुक्ताबाई बुरंगे, पूजा दत्तात्रय उपाडे, महादेव वसंत वाघमोडे, शशिकांत निवृत्ती खांडेकर, पारूबाई विलास वाघमोडे, अश्विनी शहाजी लवटे या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. तर लक्ष्मी दहिवडी वार्ड क्रमांक पाच मधून गौरी महेश स्वामी, उमा दादासो गायकवाड, मनोहर सदाशिव लिगाडे, सीमा प्रशांत पाटील हे आ.आवताडे गटाचे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर खडकी ग्रामपंचायतची एक जागा बिनविरोध झाली यामध्ये जयश्री छनुलाल रजपूत या बिनविरोध झाल्या आहेत. नंदुर ग्रामपंचायत मध्ये वैशाली मल्लाप्पा होनमाने या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की, गाव-पातळीवरील धोरणात्मक विकास बाबींची पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायत हे प्रथम केंद्र मानले जाते. आपल्या गावातील नागरिकांच्या मूलभूत आणि पायाभूत सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी कोणत्याही प्रकारचे राजकारण आड न आणता आपल्या पदाचा आणि अधिकाराचा सर्वार्थाने वापर केला पाहिजे. आपल्या गावातील विकासाभिमुख स्वप्नांना आणि विविध विकास कामाला निधीच्या रूपाने ताकद देण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी नेहमीच आपल्या सोबत असेन. गावातील जाणकार राजकीय मंडळी व सर्व ग्रामस्थांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करत आपल्या खांद्यावर गावच्या कारभाराची खूप मोठी जबाबदारी दिली आहे. या जबाबदारीला आपल्या पदाच्या माध्यमातून पूर्णपणे न्याय देण्यासाठी आपण सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून झोकून देऊन कार्य करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आणि कर्तव्य असणे गरजेचे आहे असेही आमदार आवताडे यांनी सांगितले आहे.
यावेळी श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, श्री संत दामाजी शुगरचे संचालक तानाजी काकडे, माजी संचालक राजन पाटील, पप्पू काकेकर, माजी सरपंच विजयसिंह पाटील, माजी सरपंच रवी खांडेकर, माजी उपसरपंच परमेश्वर येणपे, श्रीशैल्य गोडसे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.