पंढरपूर तालुक्यातील 2 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज मतदान

0
9 मतदान केंद्रे, निवडणुकीसाठी सर्व मिळून 100 कर्मचार्‍यांची नियुक्ती

         पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील 2 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी व गादेगाव ग्रामपंचायतीची पोटनिवडणूकीसाठी रविवार दि.5 नोव्हेंबर रोजी मतदान  होत आहे. यासाठी 100 कर्मचारी नेमले आहेत.या निवडणूक प्रकियेसाठी सर्व प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.
          राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 3 ऑक्टोबर रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकी बाबतचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार पंढरपूर तालुक्यातील एकूण 3 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक व 5 ग्रामपंचायतीमध्ये पोट निवडणूकीचा समावेश  आहे. मात्र तालुक्यातील पुळूज ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता ईश्वर वठार व गुरसाळे या दोन गावचे सार्वत्रिक निवडणूक आहे.
         तर देवडे, चिलाईवाडी, गादेगाव, शिरढोण, शेगांव दुमाला या पाच ग्रामपंचायतीसाठी पोट निवडणूक होत आहे. परंतू यातील देवडे, चिलाईवाडी, शिरढोणची पोट निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर शेगाव दुमाला ग्रामपंचायतीकडून अर्ज दाखल झाले नाहीत. तर केवळ गादेगांव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. याकरीता 1 जागेसाठी 2 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
       
       ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणूक 2023 मध्ये एकूण 9
मतदान केंद्रे असून ईश्वर वठार व गुरसाळे या दोन गावचे सार्वत्रिक निवडणूक आहे. तसेच गादेगांव या गावचे पोटनिवडणूक आहे. सदर निवडणुकीसाठी सर्व मिळून 100 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक एक दोन व तीन, पोलीस कर्मचारी व राखीव कर्मचारी यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.
शनिवारी सर्व मतदान पथके मतदान केंद्रावर पाठवली असल्याची माहती नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांनी दिली

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)